Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘Uncategorized’ Category

पुन्हा हुलकावणी देऊन गेले मेघ काळे कितीदा कोरडे गेलेत सारे पावसाळे ||धृ|| कितीदा येउनी आच्छादुनी आभाळ गेले धरेच्या अंग-प्रत्यंगात लावुन जाळ गेले कशाला दाह वाढवण्यास करती थेंब चाळे? ||१|| कधी लागेल, देवा, क्षेत्रपालाला सुगावा? कधी भिडणार धरणीला तिचा अनिरुद्ध रावा? कधी होतील गंधित चिंब भिजुनी देहवाळे? ||२|| कशी हो एकटी फळणार ही सुजलाम माती? भिजवल्यावाचुनी [...]

Read Full Post »

स्पर्श

स्पर्श ओझरता पुन्हा रोमांचित करून गेला वाटले होते ऋतू फुलण्याचा सरून गेला मस्तकाला एकदा स्वप्नी चुंबिले सख्याने सप्तरंगी भाकिते भाळी उमटवून गेला दरवळाया लागल्या श्वासांच्या लडी असाव्या माळलेला मोगरा केव्हाचा सुकून गेला पालवी फुटली अचानक वठल्या तनामनाला अंतरी कोणीतरी अमृत शिंपडून गेला थेंब रुजला स्वातिचा, घडला शिंपल्यात मोती चंद्र जेव्हा अंतरी अलगद विरघळून गेला

Read Full Post »

आधार

ज्यास प्रेमाचे न कोंदण, तो मुळी शृंगार नाही ज्यास मोहाची न झालर, प्रीत पूर्णाकार नाही रेशमी, उत्कट मिठीने बांधुनी ठेवू कशाला ? कैद इच्छेवीण करण्या प्रेम कारागार नाही खेळुनी गेलास माझ्या भावनांशी, जीवनाशी अन्‌ तरी दावा तुझा, हे प्रेम, हा व्यभिचार नाही… दाह विरहाचा तुझ्या जाळील सर्वांगा तरीही दग्ध होण्याच्या भितीने ह्यापुढे अविचार नाही जागणे [...]

Read Full Post »

तुझा हात आला हाती अपघाताने कुणी जोडली ही नाती अपघाताने ? किती रुक्ष होता माझा निर्जन रस्ता मिळालास तू सांगाती अपघाताने सुन्या मैफिलीचा झाला प्रीतीजलसा उजळताच नयनी वाती अपघाताने कुणी नाव का चंद्राचे घेतो आहे ? उजळल्या तमोमय राती अपघाताने कसे शब्द साधे माझे मोती झाले असावी शिरावर स्वाती अपघाताने अशा, मृण्मयी, आल्या वळवाच्या धारा [...]

Read Full Post »

नांदी

चंद्र पुनवेचा, असावी तीट वर काळ्या ढगाची भूषवी डोळ्यास जैसी गर्द महिरप काजळाची सागराच्या सोबतीने सोड, नौके, तू किनारा उसळत्या लाटात त्याच्या धुंद नांदी वादळाची सोसवे ना दाह विरहाचा, सख्या, येशील केव्हा ? हा न गात्रांचा पुकारा, ही विनवणी काळजाची तप्त केले, उजळले सर्वांग ज्याने कांचनासम त्या तुझ्या स्पर्शास केवळ एक उपमा – पारसाची! बोलला [...]

Read Full Post »

तहान

भरून सागर त्यांचे सरिता तहानलेली तृषा मिटे रसिकांची, कविता तहानलेली न शांभवी ही, विरही डोळ्यांमधील अश्रू कळे न सुरई कोणाकरिता तहानलेली शुकाप्रमाणे विन्मुख मोहांस राहिल्याने उरेल नीरस, कडवट शुचिता तहानलेली फिरून झाल्या विहिरी परक्या घरांतल्याही तरी न शमला अग्नी, पतिता तहानलेली जिथे तिथे लुचणाऱ्या पाहून पाडसांना भिजूनही वांझोटी धरिता तहानलेली…

Read Full Post »

Follow

Get every new post delivered to your Inbox.