पुन्हा पुन्हा पडायचे, उठायचे पुन्हा पुन्हा पदोपदी दुभंगुनी जुळायचे पुन्हा पुन्हा कुणी किती करोत घाव, तू नको धरू मनी हृदय विशाल आपले करायचे पुन्हा पुन्हा सरेल खिन्न काळ अन् निवेल दुःख प्रीतिचे फिरून जीवनी वसंत यायचे पुन्हा पुन्हा स्वतःच शुक्र हो, स्वतःच धृव हो नभांगणी मळभ मनावरी असेच यायचे पुन्हा पुन्हा फकीर होउनी हिमालयास चालल्यावरी [...]
Archive for जून, 2010
पुन्हा पुन्हा
Posted in कविता, गझल, tagged कविता on जून 16, 2010 | Leave a Comment »
डोळे
Posted in कविता, गझल, मराठी on जून 5, 2010 | १ प्रतिक्रिया »
जाल फेकणे, शिकार करणे शिकू लागले डोळे उगाच का माझ्यावर सारे खिळू लागले डोळे ? सलज्ज झुकणे कुठे हरवले प्रवाहात काळाच्या ? उघड उघड शारीर दवंडी पिटू लागले डोळे नको, नको ते खूप पाहिले, विझू लागले डोळे इतकी हसले आयुष्याला, भिजू लागले डोळे वही गुलाबी गालांची अन् स्वप्नभंग प्रेरणा काजळ-अश्रूंच्या शाईने लिहू लागले डोळे मुक्ताई [...]