कधी रस-रंग-गंधांनी ऋतूंच्या माखले नाही
कधी आषाढ-ओल्या आठवांनी नाहले नाही
तसे लक्षात येण्यासारखे नव्हतेच हे फुलणे
कुणी अंजारले नाही, कुणी गोंजारले नाही
कुणाच्या माळण्यावर का फुलांचा जोखता दर्जा ?
झुडुप का रातराणीचे कधी गंधाळले नाही ?
जगाया चारचौघींच्या प्रमाणे ना नसे माझी
जगाच्या चारचौघांनीच पण स्वीकारले नाही
जशी ओच्यात घेते मी फुलांना पारिजाताच्या
तसे हळुवार का मजला कुणीही वेचले नाही ?
वसे डोळ्यांतुनी पाणी, वसे [...]
Archive for जून, 2009
कधी रस-रंग-गंधांनी ऋतूंच्या माखले नाही
Posted in कविता, मराठी, tagged गझल, मराठी, Ghazal, Marathi on जून 29, 2009 | १ प्रतिक्रिया »
अपघात
Posted in Uncategorized, tagged गझल, मराठी, Ghazal, Marathi on जून 1, 2009 | Leave a Comment »
तुझा हात आला हाती अपघाताने
कुणी जोडली ही नाती अपघाताने ?
किती रुक्ष होता माझा निर्जन रस्ता
मिळालास तू सांगाती अपघाताने
सुन्या मैफिलीचा झाला प्रीतीजलसा
उजळताच नयनी वाती अपघाताने
कुणी नाव का चंद्राचे घेतो आहे ?
उजळल्या तमोमय राती अपघाताने
कसे शब्द साधे माझे मोती झाले
असावी शिरावर स्वाती अपघाताने
अशा, मृण्मयी, आल्या वळवाच्या धारा
भिजे चिंब न्हाती माती अपघाताने